संतगाव

निर्मलग्राम महात्मा गांधी तंटामुक्त

राडेवाडी(संतगाव) ता. पलूस जि. सांगली.

गावाच्या नावाविषयी माहिती–

मौजे रोडेवाडी गाव कृष्णानदीकाठी वसलेले आहे. येथे ‘राडे’ या आडनावाचेच फक्त लोक एकत्रित रहात असलेने गावचे नावच राडेवाडी असे ठेवण्यात आले, परंतु संतगाडगेबाबा अभियानाने गावाचा कायापालट केला. गावाचा सर्वांगीण विकास साधला गेला. या अभियानामध्ये एकमुखी अनेक निर्णय संमत झाल्याने व गावातील प्रत्येक कुटुंबात एकतरी माळकरी असल्यामुळे संपूर्ण गाव वारकरी असलेने गावचे नाव ‘संतगाव’ असे ठेवण्यात आले. गावात दररोज भजन म्हटले जाते.