ग्रामदैवत

गावचे आराध्य ग्रामदैवत श्री. बिरोबा देवालय हे आहे देवालय गावच्या मध्यवर्ती असून संपूर्ण गावकरी श्रध्देने देवाची आराधना करतात तसेच एखादे जनावर किंवा व्यक्ती आजारी पडल्यास बिरोबाचा भंडारा त्याला लावतात. त्यामुळे ते बरे होतात अशी श्रध्दा आहे. ग्रामदैवत बिरोबाचे बिरुदेव जिर्णोध्दार कमिटी तसेच देवस्थानची स्वतंत्र इनाम जमिनही आहे त्या उत्पन्नातून मंदिराची सेवा व देखभाल केली जाते.