विविध योजना

राज्य सरकारकडून राबविण्यात येणारी यशवंत ग्रामसमृध्दी योजना त्यातून गावामध्ये सर्व कॉंक्रिटीकरण करण्यात आलेले आहे. तसेच गावाला लागूनच पुरसंरक्षक भिंतीचे कामही करण्यात आलेले आहे. शासनाकडून ओढयावर पूलाचे बांधकामही मंजूर करण्यात आलेले आहे. गावास सर्वदृष्टया आवश्यक सोयी उपलब्ध आहे सुसज्ज स्मशानभूमी शेड आहे. गावास पिण्याची पाणी कमतरता भासू नये म्हणून स्वतंत्र नळ योजना नेहमी कार्यान्वित आहे.