रोजगार

गावातील मुख्य व्यवसाय शेती शेतीला कृष्णानदीवर केलेल्या लिफट एरिगेशनच्या माध्यमातून मिळते. संपूर्ण शेतजमीन समुध्द आहे आज गावात हिरवेगार आणि धनधान्याने समृध्द अशी शेती उत्पादने बाजरी, ज्वारी, उस, पालेभाज्या इ. प्रमुख पिके घेतली जातात. दुग्धव्यवसाय कुक्कुटपालन व्यवसाय तरुण प्रामुख्याने करतात तसेच बैठे व्यवसायही काही लोक गृह उद्योग करीत आहेत.


उत्पन्नाची साधने–

गावचे उत्पन्न साधन शेती आहे त्यामुळे शेतीपिक उस, सोयाबिन, नगदी पिके, घेतली जातात. दूग्धव्यवसाय हा शेतीवर आधारित मोठया प्रमाणावर केला जातो. त्याचे दर 15 दिवसाला पगार होतो तसेच कुक्कुटपालनशेळी मेंढी मोठया प्रमाणात केले जाते. अनेक महिला दुध पुरक लोणी, तूप विक्री करतात. पापड, लोणची गृह उदयोग करतात.


स्वयंरोजगार–

गावातील महमंद अबू शिकलगार आणि सर्जेराव पाटील या प्रौढ व्यक्तींनी वेल्डिंग मशीन आणून शेतीसाठी लागणारी अवजारे, मोटरी दुरुस्ती तसेच तयार छोटी मोठी अवजारे करुन स्वयंरोजगाराची उभारणी केलेली आहे. तसेच काही तरुण देखील दुध गोळा करुन दुधापासून पेढे, बर्फी इ. बनवून विक्री करुन स्वयंरोजगार करीत आहेत. काही महिला पापड, लोणची करुन स्वयंरोजगार करीत आहेत.