सुविधा

शैक्षणिक सुविधा–

गावामध्ये जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. शाळेची इमारत सुसज्ज अशी आधुनिक आहे पुरेसा स्टाफ आहे. शिक्षण तरुण व होतकरु असलेने येथील विद्यार्थी स्कॉलरशिपमध्ये गुणवत्ता यादीत येतात. तसेच गावातील पुष्कळ विद्यार्थी सध्या पुणे, मुंबई येथे संगणक क्षेत्रात उच्च पदस्थ नोकरीमध्ये आहेत. गावातील विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी किलवडी येथे जातात. शाळेचा परिसर व ग्राउंड अतिशय लोभणीय आहे शाळेमध्ये विद्याथ्र्यांना आवश्यक सर्व साहित्य व क्रिडा प्रकार पुरविले जातात.

आरोग्य सुविधा–

  • गावामध्ये संत गाडगेबाबा अभियान राबविलेने स्वच्छता ठेवली जात असलेने व पुरेसा स्वच्छ पाणीपुरवठा केला जात असलेने आरोग्य केंद्र अथवा दवाखाना याची गरज भासन नाही. आयत्यावेळी आवश्यक प्रसंगी गावातील लोक अंकलखोप येथील आरोग्य केंद्राकडे धाव घेतात. लोकांना आरोग्याच्या चांगल्या सवयी असलेने औषधोपचारावर होणारा खर्च अतिशय नगण्य आहे. त्यामुळे गावास आरोग्यवर्धक हवामानही लाभलेले आहे.